Amaravti GraminLatest News
नितेश मेश्राम मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करणारउपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची कुटुंबियांना भेट

चांदूररेल्वे येथील नितेश मेश्राम याच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी त्याच्या कुटुंबियांना भेट दिली. नितेश मेश्राम याच्या मृत्यू प्रकरणी आयोग सखोल चौकशी करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी कुटुंबियांना दिली.
श्री. मेश्राम यांनी सोमवार, दि. 13 जानेवारी रोजी मेश्राम कुटुंबियांना त्यांच्या घरी जाऊन भेट दिली. यावेळी त्यांनी नितेशची आई वंदना मेश्राम यांच्याकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. नितेशच्या मृत्यूप्रकरणी वंदना मेश्राम यांनी गेल्या नऊ वर्षांपासूनचा संपूर्ण घटनाक्रम उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्यासमोर मांडला. याप्रकरणी आयोग सखोल चौकशी करणार आहे. यासाठी पोलिस ठाण्यातील दस्तावेज, सीसीटीव्ही फुटेज, चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा तपासाची कागदपत्रे, तसेच नितेश मेश्राम याच्या मृत्यूशी संबंधित पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे असलेली सर्व कागदपत्रे मागविण्यात येणार आहे, असे श्री. मेश्राम यांनी सांगितले.
या प्रकरणी सत्यता समोर येण्यासाठी घटनेच्यावेळी पोलिस ठाण्यात असलेले अधिकारी, कर्मचारी आणि रूग्णालयात दाखल करतेवेळी उपस्थित असलेल्या डॉक्टर, कर्मचारी यांचेही बयाण घेण्यात येणार आहे. नितेश मृत्यू प्रकरणी आयोगातर्फे सखोल चौकशी करण्यात येणार आहे. आयोगाच्या कार्यवाहीबाबत कुटुंबियांना सर्व माहिती पुरविली जाईल. याबाबत कुटुंबियांना आश्वस्त केले. सदर प्रकरणात पोलिस विभागातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबतही श्री. मेश्राम यांनी माहिती जाणून घेतली.
यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर, पोलिस विभागाचे अधिकारी, तपास करणारे अधिकारी उपस्थित होते