LIVE STREAM

Crime NewsLatest News

बुलढाणा : पत्नीने पतीवर पेट्रोल टाकून पेटवले! माजी सैनिक अत्यवस्थ!

       पत्नीच्या छळाच्या, हाणामारी किंवा निर्घृण हत्येच्या घटना सर्वसामान्य बाब आहे. मात्र चक्क पत्नीने नवऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना बुलढाणा शहरात घडली. विशेष म्हणजे यातील ‘पीडित हा सेवानिवृत लष्करी जवान आहे. तो जवळपास ऐंशी टक्के भाजला असून अत्यवस्थ आहे .त्यांच्यावर आधी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर बुलढाणा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. बुलढाणा शहराचे ‘उपनगर ‘ असलेल्या सुंदरखेड मधील तार कॉलनी येथे रात्री दोन वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली. रणधीर हिम्मत गवई (वय तेहतीस वर्षे, राहणार पाचला, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा ) असे माजी सैनिकाचे नाव आहे. आरोपी पत्नीचे नाव लता रणधीर गवई(वय एक्के चाळीस वर्षे, राहणार तर कॉलनी, सुंदरखेड, तालुका व जिल्हा बुलढाणा ) असे आहे. हे दोघे पती पत्नी असले तरी आपसात अजिबात पटत नसल्याने विभक्त राहतात. पतीच्या मनात अनैतिक संबंधाचा संशय होता.
    थरारक घटनाक्रम

सोमवारी,तेरा जानेवारीच्या रात्री दोन वाजताच्या सुमारास रणधीर लताला भेटण्यासाठी आला . यावेळी दोघात कडाक्याचे भांडण झाले .संतापलेल्या लताने रणधीरच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवले. पाहतपाहता रणधीर ८० टक्के भाजला! या दोघांच्या भांडणचा आवाज आणि जिवाच्या आकांताने रंणधीरचे ओरडणे ऐकून तर कॉलनी मधील राहिवासी धावत आले. त्यांनी रणधीरच्या अंगावर पाणी ओतून आग विझविली.
घटनेची माहिती कळताच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रणधीर गवई याच्या जबानी वरून बुलढाणा शहर पोलिसांनी आरोपी लता गवै विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १९९ ( १) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सुमारे ऐंशी टक्के भाजलेल्या पतीला प्रारंभी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.नंतर त्यांचा भाऊ अरुण गवई यांच्या विनंतीवरून एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयसिंग राजपूत तपास करीत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!