AmravatiLatest News
नायलॉन मांजा – एक जीवघेणा धोका”

कधी पतंग उडवण्याचा आनंद देणारा हा मांजा आता जीवघेणा ठरत आहे. अमरावती शहरात या मांजामुळे अनेक अपघात आणि जीवघातक घटना घडत आहेत. "हे आहेत संदीप पाटील, जे १५ जानेवारी रोजी राजापेठ उड्डाण पुलावरून जात असताना नायलॉन मांजामुळे जखमी झाले. त्यांनी गळ्यात दुपट्टा बांधला होता, पण धारदार मांजाने तोही चिरला आणि त्यांच्या गळ्याला गंभीर जखम झाली." "संदीप यांनी सिटी न्यूजशी संपर्क साधून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की लाखोंचा नायलॉन मांजा जप्त झाल्याचे सांगितले जाते, पण तरीही तो बाजारात सहज उपलब्ध आहे." "नायलॉन मांजावर बंदी आहे, पण अमरावतीच्या अनेक भागांमध्ये त्याचा वापर सुरूच आहे. या मांजाची धार इतकी तीव्र आहे की ती माणसे आणि पक्षी दोघांनाही घातक ठरते." "दरवर्षी या मांजामुळे शेकडो पक्षी जखमी होतात किंवा त्यांचा मृत्यू होतो. पर्यावरणावर याचा वाईट परिणाम होत आहे."
नायलॉन मांजामुळे घडणाऱ्या घटनांनी आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करणं आवश्यक आहे, आणि आपल्यालाही हे समजून घ्यावं लागेल की एका छोट्या खेळासाठी कुणाचंही जीवन धोक्यात घालता येणार नाही.