पोहरा पूर्णा येथील नेतनराव कुटुंबीय करणार 26 जानेवारी रोजी नगर रचना कार्यालय समोर आत्मदहन
भातकुली तालुक्यातील पोहरा पूर्णा येथील महिला सहायक संचालक नगर रचना विभाग अमरावती यांच्या त्रासाला कंटाळली आहे. त्यामुळे तिने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापूर्वी न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. बबिता अनिल नेतनराव गरीब कुटुंब रोज मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित आहे. त्या कुटुंबासह गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ते शासकीय जागेवर उघड्या मातीच्या घरामध्ये राहत आहे. मौजा पोहरा गट क्रमांक २१४ येथील शासकीय वर्ग जमिनीमध्ये ५०० स्केअर फूट भूखंड जागेवर राहत आहेत ,रमाई आवास योजनाकरिता नियमाकुल करून देण्यात यावा, याकरिता त्यांनी ग्रामपंचायतला मागणी केली होती. त्यानुसार पोहरा पूर्णा ग्रामपंचायतमार्फत लेखी स्वरुपात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे . नगररचना विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्या नसल्याने सहायक संचालक नगर रचना विभाग यांनी मात्र हेतुपुरस्पर त्रास देत असल्याचा आरोप नेतनराव कुटुंबीयांनी केला आहे,
त्यामुळे शासनाने त्वरित सदर जागा नियामाकुल करून देण्यात यावी करण्यात यावी अन्यथा कुटुंबातील चारही व्यक्ती 26 जानेवारी रोजी नगर रचना विभाग कार्यालय समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे,
गेल्या अनेक वर्षांपासून घरकुल योजनेच्या लाभापासूनही वंचित असल्याने त्रस्त महिलेसह पतीने सुद्धा शासनाला इशारा दिला आहे.