LIVE STREAM

Crime NewsIndia NewsLatest News

‘मला हे लग्न करायचं नाही, हे लोक…,’ बापाने पोलिसांसमोर पोटच्या मुलीला घातल्या गोळ्या; अख्खं गावं फक्त पाहत राहिलं

मुलीचं लग्न अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलं होतं. पण त्याआधीच बापाने आपल्या मुलीची गोळ्या घालून हत्या केली. मुलीला दुसऱ्याशी लग्न कऱण्याची इच्छा असल्याने बापाने तिला ठार केलं. मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बापाने आपल्या 20 वर्षीय मुलीला पोलीस अधिकाऱ्यांसमोर गोळ्या घातल्या. तनु गुर्जर असं पीडित मुलीचं नाव आहे. तिने जाहीरपणे कुटुंबाच्या इच्छेने होत असलेलं लग्न करण्यास नकार दिला होता तसंच आपल्या आवडीच्या तरुणाशी लग्न करण्याची इच्छा जाहीर केली होती.
मंगळवारी रात्रीची घटना
मंगळवारी रात्री 9 वाजता शहराच्या गोला मंदिर परिसरात ही हत्या झाली. कथितपणे, पीडिता तनुचे वडील महेश गुर्जर आपल्या मुलीने सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडीओमुळे प्रचंड संतापले होते. यामुळेच संतापलेल्या बापाने देशी बंदुकीने गोळी घालून तिची हत्या केली. यावेळी तनुचा चुलत भाऊ राहुलने कथितपणे मदत केली. त्यानेही तनुवर गोळ्या झाडल्या ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
हत्येच्या काही तास आधी तनुने सोशल मीडियावर टाकला होता व्हिडीओ
हत्येआधी तरुणीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओतून तिने कुटुंबीय जबरदस्ती आपलं लग्न लावत असल्याचा आरोप केला होता. तसंच आपलं दुसऱ्यावर प्रेम आहे असंही जाहीर केलं होतं. 52 सेकंदांच्या या व्हिडीओत तिने वडील महेश आणि कुटुंबातील अन्य लोकांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला.
‘माझ्या जीवाला धोका’
व्हिडीओत तनुने सांगितलं की, “माझी विक्कीशी लग्न करण्याची इच्छा आहे. आधी माझं कुटुंब यासाठी तयार झालं होतं, पण नंतर विरोध केला. ते मला रोज मारहाण करत असत आणि जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. जर मला काही झालं तर यासाठी माझं कुटुंब जबाबदार असेल”. तनुने व्हिडीओत ज्या विक्कीचा उल्लेख केला आहे, तो उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे राहतो. गेल्या 6 वर्षांपासून तो तुनसह प्रेमसंबंधात होता.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद सोडवण्यासाठी पोहोचले होते पोलीस
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधिक्षक धर्मवीर सिंग यांच्या नेतत्वात पोलीस अधिकारी तनुच्या घरी पोहोचले आणि वाद निर्माण करणाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. वाद मिटवण्यासाठी सामूहिक पंचायत आयोजित करण्यात आली. यावेळी तनुने घरी राहण्यास नकार दिला आणि आपल्या वन स्टॉप सेंटरला नेलं जावं अशी विनंती केली. वन स़्टॉप सेंटर हा हिंसाचाराने पीडित महिलांना संरक्षण प्रदान करण्याचा हा सरकार चालवत असलेला उपक्रम आहे. दरम्यान तिच्या वडिलांनी आपल्या एकांतात तिच्याशी बोलायचं असल्याचं म्हटलं.
वडील आणि चुलत भावाने तनुला घातल्या गोळ्या
यानंतर जे झालं त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. महेशजवळ गावठी पिस्तूल होतं. या पिस्तुलाने त्याने मुलीच्या छातीत गोळी घातली. यानंतर राहुलने तनुच्या डोकं, गळा, डोळे आणि नाकाच्या मधोमध गोळ्या घातल्या. यानंतर तनुचा मृत्यू झाला.
पोलिसांनी तनुला केलं अटक
यानंतर बाप आणि भावाने पोलिसांनाही बंदुकीचा धका दाखवला. पोलिसांनी महेशला अखेर अटक केली. राहुल मात्र फरार होण्यात अयशस्वी झाला. 18 जानेवारीला तनुचं लग्न होणार होतं. पण चार दिवसांपूर्वीच तिची हत्या झाली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!