एम. ए. आजीवन अध्ययन व विस्तार अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांची तपोवनला भेट

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग अंतर्गत एम. ए. आजीवन अध्ययन व विस्तार अभ्यासक्रम् विद्याथ्र्यांनी नुकतीच विदर्भ महारोगी संस्था, तपोवन येथे क्षेत्रभेट दिली. यावेळी संस्थेचे उपसचिव ऋषिकेश देशपांडे यांनी तपोमूर्ती दाजीसाहेब पटवर्धन यांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती दिली. दाजीसाहेबांना पुरस्कार अथवा प्रसिद्धीचा कुठलाच हव्यास नव्हता, केवळ महारोग्यांची सुश्रूषा करणे एवढेच त्यांना माहिती होते. कर्नाटकातील जामखंडी ते कलकत्ता येथून वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर दाजीसाहेब अमरावतीत आले आणि दादासाहेब खापर्डे यांच्या सहकार्यातून स्वातंत्र चळवळ ते तपोवनामधील महारोगी सुश्रूषा असा त्यांचा प्रवास ऋषिकेश देशपांडे यांनी उकलून दाखविला.
सध्यस्थितीत तपोवन येथे 650 महारोगी, आदिवासी विद्यार्थी, अनाथ इत्यादी व्यक्ती आश्रयाला आहेत. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या तपोवनात सर्व आश्रीत चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहेत. ऋषिकेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी व प्राध्यापकांनी महारोगी चालवीत असलेल्या लघु उद्योग केंद्राला भेट दिली आणि बोट नसलेली माणसं सक्षमपणे जीवन जगत असल्याचा अनुभव घेतला. अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रशांत भगत यांनी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांच्याशी चर्चा करून त्यांचे आभार मानले. या क्षेत्रभेटीचा भविष्यात विद्याथ्र्यांना आपल्या जीवनात, व्यवसायात आणि नोकरीत भरीव उपयोग होईल अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या क्षेत्रभेटीचे आयोजन विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी प्रा. रोहित येवतीकर, प्रा. राहुल मिश्रा, प्रा. अमोल घुलक्षे, डॉ. अंबादास घुले, प्रा. वैभव जिसकार, प्रा. सुरेश रहाटे, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.