डॉ. मनिषा कोडापे जिजाऊची लेक पुरस्काराने सन्मानित

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. मनिषा कोडापे यांची विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून झालेल्या निवडीबद्दल माँ साहेब राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना ‘जिजाऊची लेक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संत गाडगेेे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग अंतर्गत चालविल्या जाणाया छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन अभ्यासक्रमाद्वारे विद्यापीठात राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकुल परीस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले. स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. अशा या राजमातेच्या जयंती निमित्य आयोजित कार्यक्रमात आपल्या कार्याच्या व कर्तृत्वाच्या बळावर स्वत:ची ओळख निर्माण करणाया डॉ. मनिषा कोडापे यांना ‘जिजाऊची लेक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. मनिषा कोडापे यांचा अमरावती शहराच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. विद्या शर्मा, बालशौर्य पुरस्कारप्राप्त कु. करीना थापा इत्यादींच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला. याबद्दल डॉ.मनिषा कोडापे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने झाली. प्रास्ताविक डॉ. मंजुषा बारबुद्धे, संचालन डॉ. अश्विनी टाले, तर आभार प्रा. वृषाली जवंजाळ यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.