Latest NewsLocal News
डॉ. विद्या शर्मा ‘जिजाऊची लेक’ पुरस्काराने सन्मानित

राजमाता जिजाऊ महाराष्ट्रच नव्हे, तर देशाला आपल्या शूरता व सुशासनाने प्रभावित करणाया राजमाता, जिने शिवबाला घडविले, बया वाईटाचा विवेक दिला, अशा या राजमातेच्या जयंती निमित्त आपल्या कार्य व कर्तृत्वाच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करणाया डॉ. विद्या शर्मा यांना ‘जिजाऊची लेक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागा अंतर्गत येणाया एम.ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन अभ्यासक्रमाद्वारा आयोजित ‘राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त’ विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाया महिलांचा सत्कार करण्यात आला. कुलगुरू, डॉ. मिलींद बारहाते यांची प्रेरणा व विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात हा सत्कार समारंभ पार पडला. व्यासपीठावर विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव डॉ. अविनाश असनारे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके या प्रमुख अतिथी म्हणून तर प्रमुख वक्त्या म्हणून क्षिप्राताई मानकर उपस्थित होत्या.
वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किरण नगर, अमरावती येथील गणित विभागाच्या विभाग प्रमुख, डॉ. विद्या शर्मा यांनी गणित विषयात विद्याथ्र्यांसाठी केलेल्या भरीव कामगिर व त्यांची विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख, डॉ. मनीषा कोडापे, राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारप्राप्त कु. करीना थापा, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, अभियंता श्री. शशिकांत रोडे, विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.