Latest NewsLocal News
विद्यापीठात ‘हेल्थ व फिटनेस विक’ चे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते उद्घाटन

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ‘हेल्थ व फिटनेस वीक’ चे आयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. मिलींद बाराहाते यांच्या हस्ते वीक चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना कुलगुरू डॉ. मिलींद बाराहाते म्हणाले, शारीरिक शिक्षण हा महत्वाचा विभाग असून नियमित क्रिया आणि व्यायाम करावा, अन्य विभागातील विद्याथ्र्यांच्या स्वास्थ्यासाठी सुध्दा विभागातील विद्याथ्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी शारीरिक शिक्षणाचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल याविषयी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. शारीरिक शिक्षण विभागाचे विद्यार्थी हेंल्थ इज वेल्थचे ब्राँड अॅम्बेसेडर आहेत, असेही ते म्हणाले.
फिटनेस विकबद्दलची विस्तृत माहिती शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. तनुजा राऊत यांनी दिली. नागरिकांनीही या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. सदर फिटनेस वीक दिनांक 18 जानेवारी पर्यंत राहणार असून विद्यापीठातील सर्व विभागामधील विद्यार्थी, सर्व कर्मचारी, शिक्षकवृंद त्याचबरोबर अमरावती शहरातील सर्वसामान्य नागरिकांची बी.एम.आय., लेग-बॅक स्ट्रेंथ, हेंड ग्रीप स्ट्रेंथ, शारीरिक संतुलन, बी.पी., हिमोग्लोबिन, हेंड-आयकोआर्डिनेशन, रीअॅक्शन टाईम अशा घटकांची विनामूल्य तपासणी करण्यात येणार आहे. संचालन आदेश रक्षे यांनी, तर आभार शीतल देवी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. हेमंतराज कावरे, डॉ. सविता केने, डॉ. अतुल बिजवे, डॉ. विजय निमकर, कु. सविता बावनथडे, श्री निलेश इंगोले, श्री सौरभ त्रिपाठी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला शारीरिक शिक्षण विभागाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.