उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी केली इतवारा बाजार परिसराची पाहणी
इतवारा बाजार परिसरात अनेक दिवसापासून दुकानदाराने अनधिकृतपणे अतिक्रमण केलेले अतिक्रमण आज बाजार परवाना विभागामार्फत काढण्यात आले. सहा ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाई दरम्यान कटले, हातगाड्या, अनधिकृत साहित्य, टेबल, लोखंडी साहित्य, बासे तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. नागरिकांनी या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले. अमरावती महापालिका उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी आज दिनांक १५ जानेवारी,२०२५ रोजी इतवारा बाजार या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्या अनुषंगाने उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली बाजार परवाना अधिक्षक आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी या कार्यक्षेत्रात दक्षतेने कार्यरत होते.
इतवारा बाजार परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांच्या उपस्थितीत आज इतवारा बाजार परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. प्रत्येक दुकानदाराने डस्टबीन ठेवण्याचे निर्देश यावेळी उपायुक्त यांनी दिले. सदर दुकानदाराने परिसर स्वच्छ ठेवावे असे निर्देशही यावेळी देण्यात आले. इतवारा बाजार परिसर संपूर्ण स्वच्छ व्हावा याच्यासाठी या परिसरातील स्वच्छता कर्मचारी, दुकानदार यांनी संयुक्त स्वच्छता मोहीम राबावावी अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. या परिसरात नालीवर कोणीही दुकान लावू नये असे सक्त निर्देश यावेळी त्यांनी दिले. शहरातील अतिक्रमण, पदपथांवर मुक्काम ठोकणारे फिरस्ते आणि अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून संयुक्त कारवाई केली जात आहे. पाहणी दरम्यान प्रत्येक दुकानदाराशी भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिका धडक कारवाई केली.
शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय घाटणाऱ्या अतिक्रमणधारकांवर अमरावती महानगरपालिकेची कारवाई सुरूच असुन आज इतवारा बाजार येथे फूटपाथ / नालीवरील मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण महानगरपालिका उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांच्या नेतृत्वात बाजार परवाना विभाग, अतिक्रमण विभाग, उत्तर झोन क्र.१ रामुपरी कॅंम्प, मध्य झोन क्र.२ राजापेठ यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आले.
शहरातील विविध भागात मनपाद्वारे अतिक्रमण निर्मूलन मोहीम मागील काही दिवसांपासुन सातत्याने सुरु असुन इतवारा बाजार परिसरातील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात काढून रस्ते मोकळे करण्यात आले. फुटपाथवर केली पक्के बांधकाम, दुकानांसमोरील बांधकाम केलेले रॅम्प, कच्चे व पक्के शेड तोडण्यात आले आहे व फुटपाथवर ठेवण्यात आलेले साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले.
इतवारा बाजारात खरेदीदारांची गर्दी असते, मात्र दुकानदारांच्या अतिक्रमणामुळे पायी चालणाऱ्याला सुद्धा मार्ग काढणे कठीण जाते. आजच्या कारवाईत अश्या रस्त्यावर अनधिकृतरीत्या आलेल्या दुकानदारांचे अतिक्रमण काढण्यात आले. त्याचप्रमाणे पत्र्याचे रोड लाऊन फुटपाथवर अतिक्रमण केले असल्याचे आढळुन आल्याने त्यांचे अतिक्रमण जेसीबीद्वारे काढण्यात आले. मागील काही दिवसांपासुन रस्त्यावरील अतिक्रमण धारकांनी स्वतः हुन अतिक्रमण काढण्याच्या सुचना मनपातर्फे सातत्याने देण्यात येत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून, कारवाईची तमा न बाळगता अतिक्रमण उभेच होते त्यामुळे मनपा बाजार परवाना विभागाद्वारे कारवाई करण्यात आली. तसेच फुटपाथ व सार्वजनिक रस्त्यांवर पुन्हा फुटपाथवर अतिक्रमण न करण्याच्या सूचना अतिक्रमणधारकांना देण्यात आल्या. कारवाई दरम्यान अतिक्रमण निर्मुलन पथक पूर्णवेळ उपस्थीत होते.
या पाहणी दरम्यान सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, बाजार परवाना अधिक्षक उदय चव्हाण, अतिक्रमण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.