महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी केली ओपन स्पॉट, सावता मैदान, मार्कस मस्जिद, चंद्रानगर, चावडी चौक परिसरातील साफ सफाईच्या कामाची पाहणी

आज दिनांक १६/०१/२०२५ रोजी प्रभाग क्रमांक २१ जुनी वस्ती मधिल कोंडेश्वर रोड वरील कचरा ओपन स्पॉट, सावता मैदान, मार्कस मस्जिद, चंद्रानगर, चावडी चौक परिसरातील साफ सफाई कामाची पाहणी मा.अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी केली.
या पाहणी दरम्यान मार्कस मस्जिद परीसरातील नाली सफाई, रस्त्यांची सफाई करुन घेण्याबाबत सुचना त्यांनी दिल्या व रस्त्याच्या कडेला असलेले प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी दिल्या. रस्ते सफाईचे काम करतांना काही अडचण आल्यास, तक्रार असल्यास थेट मला सांगा. पण काम चांगले झाले नाही, तर कारवाईसाठीही तयार रहा, असा इशारा अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी दिल्या. स्वच्छतेच्या कामात आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. यामध्ये थोडीही कुचराई चालणार नाही. जो रस्ता किंवा विभाग ज्याच्याकडे आहे त्याने त्या रस्त्याची पूर्ण जबाबदारी घेणे अपेक्षित आहे, असेही अतिरिक्त आयुक्तांनी नमूद केले. सकाळी सहा वाजता रस्ते सफाईचे काम सुरू व्हायला पाहिजे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडतील तेव्हा त्यांना शहर स्वच्छ दिसेल. रात्री शहरातील दुकाने, व्यापारी गाळे असलेले भाग स्वच्छ केले, म्हणजे सकाळी तो कचरा दिसणार नाही. जेवढे लवकर काम होईल तेवढे चांगले आहे. आठ ते साडेआठपर्यंत रस्ते झाडण्याचे काम पूर्ण होईल. त्याप्रमाणेच दुपारी १२ ते २ या काळात ड्युटी संपण्यापूर्वी आपापल्या रस्त्यावर फेरफटका मारून कुठे काही कचरा असेल तर तो साफ करावा, असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले. महानगरपालिकेने कामकाजात व्यावसायिक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याची जाणीव ठेवूनच काम केले पाहिजे, असेही अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक म्हणाल्या.
तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता), सहाय्यक आयुक्त झोन क्र.४ यांनी सुध्दा प्रभागातील तक्रार निवारण केंद्र, मुख्य रस्ते सफाई मनपा कामगांराची तपासणी केली.
सदर ठिकाणी जेष्ठ स्वास्थ निरीक्षक शारदा गुल्हाने, स्वास्थ निरीक्षक, कंत्राटदार, बिटप्युन उपस्थित होते.