AmravatiLocal News
विद्यापीठातर्फे बाल शौर्य पुरस्कारप्राप्त करीना थापा हिचा सत्कार

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत एम. ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन अभ्यासक्रमाद्वारे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारप्राप्त कु. करीना थापा हिला 'लेक जिजाऊची' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित वक्त्यांनी विविध उदाहरणाव्दारे जिजाऊ माँ साहेबांच्या कार्याचे महत्व सांगितले.
कु. करीना थापा हिच्या समयसुचकतेमुळे अमरावती शहरतील कठोरा परिसरातील जय अंबा अपार्टमेंटला लागलेल्या भीषण आगीत ७० लोकांचे प्राण वाचले. तिच्या या कर्तबगारीचा संपूर्ण देशाला परिचय झाला व अमरावतीचे नाव संपूर्ण भारतात उंचावलेे. यावेळी शहराच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य डॉ. विद्या शर्मा, डॉ. मनिषा कोडापे, विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.