अमरावती महानगरपालिका शिक्षण विभाग द्वारा संचालित महानगरपालिका शाळांमध्ये गेल इंडिया लिमिटेड, नई दिल्ली तर्फे मिनी विज्ञान केंद्र उदघाटन समारंभ

अमरावती महानगर पालिका शिक्षण विभाग द्वारा संचालित महानगरपालिका शाळांमध्ये गेल इंडिया लिमिटेड, नई दिल्ली तर्फे मिनी विज्ञान केंद्र उदघाटन समारंभ शनिवार दिनांक 18/1/2025 रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रमांचे उदघाटक माजी आमदार श्री प्रवीण भाऊ पोटे (माजी पालक मंत्री) यांच्या हस्ते घेण्यात आले.
कार्यकामात प्रमुख उपस्थिति म्हणून श्री सचिन कलंत्रे (आयुक्त अमरावती महानगरपालिका), मा. डॉ. रविकांत कोल्हे (स्वतंत्र संचालक गेल इंडिया लिमिटेड), माननीय प्राध्यापक रवीभाऊ खांडेकर (भाजपा प्रदेश सदस्य), मा. श्री. विलासभाऊ इंगोले (माजी महापौर मनपा, अमरावती), माजी नगरसेवक संगीताताई बुरंगे, मनोज भेले, गंगाताई खारकर, सुरेखा लुंगारे, मा. श्री. डॉ. प्रकाश मेश्राम सर (शिक्षणाधिकारी मनपा अमरावती) आदि मान्यवर उपस्थित होते.
सदर उद्घाटन म. न. पा हिंदी उच्च प्राथमिक शाळा क्र. 11 भाजीबाजार व म. न. पा. मराठी शाळा क्र. 6 खरकडीपूराच्या प्रांगणात घेण्यात आला.
उद्घाटनाचे प्रास्ताविक मा. श्री. डॉ. प्रकाश मेश्राम सर (शिक्षणाधिकारी मनपा अमरावती) यांनी केले.
उद्घाटन समारोहात माननीय प्राध्यापक रवीभाऊ खांडेकर (भाजपा प्रदेश सदस्य), मा. श्री. विलासभाऊ इंगोले (माजी महापौर मनपा, अमरावती), श्री सचिन कलंत्रे (आयुक्त अमरावती महानगर पालिका), मा. डॉ. रविकांत कोल्हे (स्वतंत्र संचालक गेलं इंडिया लिमिटेड) या मान्यवर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व मान्यवरांनी मनपा शाळांमध्ये होत असलेल्या चांगल्या कामांचे व अध्यापनाचे कौतुक केले. तसेच गेल इंडिया लिमिटेड तर्फे मनपा शाळांमध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांसाठी आभार व्यक्त केले. मनपाच्या शाळांचा विकास करण्यासाठी विविध उपक्रमही सुचविण्यात आले.