AmravatiCrime NewsLatest News
“फूटपाथवरील भिकाऱ्यांवर दारुड्यांची अमानवी मारहाण; राजापेठ पोलिसांची तत्काळ कारवाई”
"राजापेठ परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दारूच्या नशेत काही तरुणांनी फूटपाथवर झोपलेल्या निराधार भिकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपींना जेरबंद केलं आहे.
"घटना राजापेठ परिसरातील आहे, जिथे काही तरुणांनी दारूच्या नशेत फूटपाथवर झोपलेल्या निराधार भिकाऱ्यांना मारहाण केली. या तरुणांनी भिकाऱ्यांच्या अंगावरील पांघरूण खेचून त्यांना अमानवी पद्धतीने मारहाण केली आणि पळून गेले. हा सर्व प्रकार एका प्रत्यक्षदर्शीने मोबाईलवर शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केल्याने प्रकार उघडकीस आला.
राजापेठ पोलीस स्टेशनचे थानेदार पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली डीपी पथकाने तत्काळ तपास सुरू केला. पीएसआय मिलिंद दिवटे, डीबी प्रमुख मनीष करपे, रवी लिखितकर, पंकज काटे, आणि सागर भाजगोरे या पथकाने अवघ्या काही तासांत आरोपींना शोधून काढलं. सध्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे."
सामाजिक बांधिलकी आणि पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे या प्रकरणाला न्याय मिळाला आहे. पण प्रश्न असा आहे की अशा घटना आपल्या समाजाचं वास्तव अधोरेखित करत नाहीत का?