दहावी परीक्षा प्रवेशपत्रे उपलब्ध – 20 जानेवारीपासून डाऊनलोड करा!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ पुणे यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) परीक्षा दहावीचे प्रवेशपत्र 20 जानेवारीपासून अपलोड करण्याची माहिती दिली आहे. परीक्षा 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना आहे की त्यांनी आपले प्रवेशपत्र वेळेत डाऊनलोड करून तयारीसाठी सज्ज व्हावे.
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांना व त्यांचे पालक आणि शिक्षकांना सूचित केले आहे की SSC परीक्षा प्रवेशपत्रे 20 जानेवारी 2025 पासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थी प्रवेशपत्रे ऑनलाइन डाऊनलोड करू शकतात अथवा संबंधित शाळांमध्ये जाऊन प्राप्त करू शकतात.
अमरावती बोर्डाने परीक्षेच्या तयारीसाठी विशेष नियोजन केले आहे. या विभागामध्ये एकूण पाच जिल्हे समाविष्ट आहेत. एसएससी व एचएससी परीक्षेसाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.
सिटी न्यूज तर्फे 17 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!
अधिक माहिती साठी संपर्क करा:
अमरावती बोर्ड विभागाचे विशेष संपर्क क्रमांक लवकरच प्रकाशित करण्यात येतील.विद्यार्थ्यांनी व पालकांनी वेळेत सर्व माहिती घेऊन परीक्षेची तयारी पूर्ण करावी