जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी तिघांची क्रूर मारहाण

फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील बेनोडा येथील क्रांती किराणा जवळ घडली घटना.२९ वर्षीय यश अनिल थोरात याला लोखंडी रॉड आणि चाकूने केली गंभीर मारहाण. जुन्या वादाचा सूड घेण्यासाठी तीन आरोपींनी केली मारहाण, पोलीस तक्रार दाखल.गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.
फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी तिघांनी २९ वर्षीय युवकावर गंभीर हल्ला केला आहे. लोखंडी रॉड आणि चाकूने मारहाण करत जखमी व्यक्तीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेनोडा येथील क्रांती किराणा दुकानाजवळ ही घटना घडली. मंगलधाम परिसरात राहणारा २९ वर्षीय यश अनिल थोरात याला तिघा आरोपींनी मिळून जबर मारहाण केली. लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार करत, चाकूने तोंडावर मूठ मारून जखमी करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, यश थोरात याने काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला मारहाण केली होती. त्याचा सूड घेण्यासाठी या तिघांनी हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. यामुळे यश थोरातला डोक्यावर आणि तोंडावर गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी यशने आपल्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याच्या भावाने तातडीने फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तक्रार दाखल करून तिघांविरुद्ध कलम ११८, १, ३ (५) बी एन एस अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही घटना नक्की कोणत्या कारणावरून घडली आणि आरोपींवर योग्य ती कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.