ॲड. यशोमती ठाकूर सावित्रीच्या लेकी पुरस्काराने सन्मानित सन्मानित,
पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यात ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्कार सोहळ्याचा थाटात समारंभ पार पडला. काँग्रेस नेत्या व माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल या पुरस्काराने गौरवण्यात आले.
“पुण्याच्या महात्मा फुले वाड्यात ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते ॲड. यशोमती ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यमान राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर रोखठोक भूमिका घेतली.
त्या म्हणाल्या, ‘देशाचा इतिहास आणि संविधान बदलण्याचे षडयंत्र सुरू आहे. तरुणांनी याला रोखण्यासाठी पुढे आले पाहिजे. आम्ही संविधानाच्या रक्षणासाठीचा लढा कधीच सोडणार नाही.’ या सोहळ्यात विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. डॉ. बाबा आढाव यांनी महिलांनी अन्यायाविरोधात उभं राहण्याचं आवाहन केलं. “सावित्रीच्या लेकींनी महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश दिला आणि संविधान रक्षणासाठी लढण्याची गरज अधोरेखित केली.