स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ च्या अनुषंगाने दस्तुरनगर व जोग-स्टेडियममध्ये स्वच्छता अभियानाची सुरूवात

मा.आयुक्त व मा.अतिरिक्त आयुक्त मॅडम व मा.उपायुक्त (प्रशा.) मॅडम यांच्या आदेशानुसार तसेच सहाय्यक आयुक्त झोन क्र.३ व वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी महापौर सौ.वंदना कंगाले व स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक डॉ.श्वेता बोके यांच्या उपस्थितीत आज दि.२०/०१/२०२५ रोजी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण २०२४” च्या अनुषंगाने पुर्व झोन क्र.३ दस्तुरनगर अंतर्गत प्रभाग क्र.८ जोग-स्टेडियम प्रभागातंर्गत आदिवासी कॉलनी, लघुवेतन कॉलनी परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्या अंतर्गत मुख्य रस्त्याची, डीव्हायडर व संपूर्ण परिसरातील साफ़ सफाई करून घेऊन प्लास्टिक पन्नी गोळा करण्यात आले, गाजर गवत काढण्यात आले व झाड़ू साफ सफाई करण्यात आली तसेच नाली साफ़ सफाई करून घेऊन कचरा व मलमा उचलण्यात आले असे संपूर्ण परिसराची साफ़ सफाई करण्यात आली. या अभियानाद्वारे नागरीकांना आपला रहिवासी परिसर स्वच्छ ठेवणे, प्लास्टिक पन्नी न वापरने बाबत, प्लास्टिक चा वापर बंद करने बाबत व शहर परिसरात स्वच्छता बाबत तसेच ओला व सुका कचरा वेगवेगळ्या ठेवण्यासाठी २ डस्टबिन वापरुन कचरा बाहेर इतरत्र न फेंकता घंटागाडीमध्ये टाकण्याबाबत जनजागृती करण्यात आली. सदर ठिकाणी ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक कुंदन हडाले, स्वास्थ निरीक्षक मनिष नकवाल, मोहित जाधव, साफ़ सफाई कंत्राटदार व झोनचे स्वास्थ निरीक्षक, बिटप्यून, मनपा स्थायी व कंत्राटी सफाई कामगार, सुपरवाइजर, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.