LIVE STREAM

Accident News

नाशिक : एसएमबीटीजवळ भीषण अपघातात ३ जण ठार, २ गंभीर जखमी

इगतपुरी : घोटी सिन्नर महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ ओव्हरटेक करणाऱ्या MH05 FW 0030 ह्या क्रमांकाच्या रिक्षाला समोरून येणारा NL01 AF 0458 हा कंटेनर न दिसल्याने रिक्षाने कंटेनरला धडक दिली. यामुळे रिक्षा आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. ह्या अपघातात एका बालिकेसह ३ जण ठार झाले आहेत. रिक्षाचालक अमोल विनायक घुगे वय २५ रा. नांदवली, कल्याण हा जागीच ठार तर स्वरा अमोल घुगे वय ४, मार्तंड पिराजी आव्हाड वय ६० यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला.
प्रतीक्षा अमोल घुगे वय २२, कलावती मार्तंड आव्हाड वय ५८, रा. कल्याण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. ट्रकचालक राहुल कुमार प्रजापती वय २८ रा. झारखंड याला तपासासाठी वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी पुढील तपास कसून सुरु केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!