मोर्शी जवळ शेत शिवारात युवकाचा धारदार शस्त्राने खून – पोलिसांचा तपास सुरू

“मोर्शी जवळील यरला शिरभातेच्या शेत जवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. एका देशी दारूच्या दुकानात काम करणाऱ्या 17 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथक दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या मोर्शी पोलिसांकडून वेगाने सुरू आहे.”
“ही घटना मोर्शीपासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेल्या यरला शिरभाते शेत जवळ घडली आहे. 24 जानेवारीच्या सकाळी मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतक सुनील अनंत चवरे हा 17 वर्षीय युवक असून, त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथकाने तपास सुरू केला आहे. घटना स्थळी DYSP दाखल झाले घटना स्थळाची पाहणी केली सुनील हा रात्रीपासून घरा बाहेर होता, अशी माहिती मिळाली दिली आहे. पोलीस घटनास्थळाच्या परिसरातील सर्व माहिती गोळा करत असून, आरोपीचा शोध घेत आहेत. शव विच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलीस या प्रकरणाचा तपास झपाट्याने करत आहेत.”
“सुनील अनंत चवरे यांच्या खुनाचे कारण आणि आरोपींचा शोध लवकरच लागेल अशी अपेक्षा आहे. या धक्कादायक घटनेने मोर्शी परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.