AmravatiLatest News
पाण्याखाली सायकलिंग करत तिरंग्याला अनोखी मानवंदना – अमरावती पोलिस कर्मचाऱ्याचा विक्रम

"प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभर विविध उपक्रम साजरे होत असताना, अमरावती पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने पाण्याखाली तिरंग्याला मानवंदना देत अनोख्या देशभक्तीचा परिचय दिला आहे. चला पाहूया, त्यांच्या या विक्रमी कामगिरीची विशेष झलक."
"अमरावती पोलीस दलातील प्रवीण आखरे यांनी आपल्या कौशल्याने आणि धाडसाने देशभक्तीचा अनोखा संदेश दिला आहे. पोलीस जलतरण तलावात त्यांनी 25 फूट पाण्याखाली जाऊन सायकलिंग करत तिरंग्याला मानवंदना दिली. यासाठी त्यांनी 1 मिनिट 52 सेकंद श्वसनावर नियंत्रण ठेवत विना ऑक्सिजन तळ गाठला. सायकलिंग करत 25 मीटर अंतर पार करणे हे सोपे नव्हते, पण आखरे यांच्या जिद्दीने हा उपक्रम यशस्वी केला. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत, त्यांची प्रशंसा केली."
"अमरावती पोलीस दलातील प्रवीण आखरे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीची अनोखी भावना प्रकट केली आहे. पाण्याखाली सायकलिंग करत तिरंग्याला दिलेली मानवंदना ही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी ठरतेय. अशा धाडसी आणि प्रेरणादायी पोलीस कर्मचाऱ्यांमुळेच देशाचा आत्मविश्वास उंचावतो. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन