LIVE STREAM

Crime NewsLatest News

लग्नानंतर अनैतिक संबंध जुळले, बापाच्या डोळ्यांदेखत आईनेच प्रियकराच्या साथीने ४ वर्षीय मुलाचे अपहरण केले

      एका कापड व्यावसायिकाच्या ४ वर्षांच्या मुलाचे त्याच्या पहिल्या पत्नीने तिच्या प्रियकरासह अपहरण केले. ही घटना, उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये घडली आहे. व्यवसायिक आपल्या मुलाला मॉलमधून खरेदी केल्यानंतर जेव्हा बाहेर घेऊन आला, तेव्हा त्याची पहिली पत्नी धावत आली. आणि तीने मुलाला हिसकावले. साथीदारांसह आलेल्या प्रियकराने पतीला घेरून मारहाण करण्यास सुरुवात केली. आणि नंतर मुलाला घेऊन दोघांनीही पळ काढला.
    मुरादाबादमधील सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील कंठ रोडवरील विशाल मेगा मार्टच्या बाहेर ही घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्हीही समोर आला असून, त्यात संपूर्ण घटना दिसत आहे. मुरादाबाद येथील हरथला विद्यानगर येथे राहणारा मोहम्मद जुबेर यांचा कपड्यांचा घाऊक व्यवसाय आहे. त्याचा आपल्या पहिल्या पत्नीशी वाद सुरू आहे. ती तिच्या प्रियकरासोबत राहते. आणि मूलगा वडिलांसोबत राहतो.
    असे आहे प्रकरण

जुबेरने सांगितले की, तो त्याचा मुलगा इबादसोबत शॉपिंगसाठी विशाल मेगा मार्टमध्ये आला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जुबेरची पत्नी लायबाही विशाल मेगा मार्ट बाहेर उभी राहून वाट पाहत असल्याचे दिसत आहे. जुबेर मेगा मार्टमधून दुसऱ्या महिलेसोबत बाहेर पडतो. मुलगा इबादने त्या महिलेचा हात धरला होता. तेवढ्यात लायबा धावत येते. आणि त्या महिलेकडून इबादला हिसकावून घेते.
जवळच उभा असलेला महिलेचा प्रियकर त्याच्या अनेक मित्रांसह जुबेरवर हल्ला करतो. ते लोक त्याला घेरून झुबेरला मारहाण करू लागले. काही वेळाने सर्वजण मुलाला घेऊन पळून जातात. जुबेरच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर लायबाचे अफेअर बांगला गावातील दीपक वाल्मिकीसोबत सुरू झाले. इबाद २ महिन्यांचा असताना लायबाने झुबेरला सोडले. आणि तेव्हापासून लायबा दीपकसोबत राहत आहे.
तिला दीपकपासूनही मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले. जुबेरने पत्नी लायबा, प्रियकर दीपक आणि त्याच्या साथीदारांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. लायबाने झुबेरवर अनेकदा हल्ला केल्याचा आरोप आहे. आधी ती तान्ह्या मुलाला सोडून गेली आणि आता मुलाला झुबेरपासून हिसकावले.
इन्स्पेक्टर सिव्हिल लाइन यांनी सांगितले की, मूल अल्पवयीन असल्याने पती-पत्नीमध्ये मुलाबाबत वाद सुरू आहे. म्हणूनच लायबा त्याला सोबत घेऊन गेली आहे. लायबा आणि मुलाचा शोध सुरू आहे. जुबेरच्या तक्रारीवर नियमानुसार कारवाई केली जाईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!