AmravatiLatest NewsLocal News
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता’ विषयावर विद्यापीठात 29 जानेवारी रोजी व्याख्यानमाला

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने स्व. श्री गोविंदाजी खोब्राागडे स्मृतिप्रीत्यर्थ दि. 29 जानेवारी, 2025 रोजी दु. 4.00 वा. विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्राच्या सभागृहामध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता’ या विषयावर नागपूर येथील सुप्रसिध्द वक्ते प्रा. रणजीत मेश्राम हे व्याख्यान देणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनसंचार संस्थेचे क्षेत्रिय संचालक डॉ. राजेशसिंह कुशवाह, दानदात्यांचे प्रतिनिधी श्रीमती रजनीताई खोब्राागडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तरी या व्याख्यानमालेला उपस्थित राहून सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी केले आहे.