विद्यापीठातील पदव्युत्तर इंग्रजी विभागात माजी विद्यार्थी मेळावा व सत्कार सोहळा संपन्न

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर इंग्रजी विभागामध्ये माजी विद्यार्थी मेळावा व गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, विभाग प्रमुख डॉ. संदीप जोशी उपस्थित होते.
याप्रसंगी विभागातील विद्यार्थी श्री.साकेत बिसांदरे, कु. अंजली सावलकर, कु. रीबा शेख़, कु. स्वाती कासार यांनी नेट-सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणा-या प्रतिष्ठित स्वामिनी पुरस्काराच्या मानकरी शुभांगी जोशी यांचा प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आपल्या विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा देत प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे म्हणाले, इंग्रजी विभागातील विद्याथ्र्यांनी कठोर परिश्रम आणि अथक प्रयत्न करुन यश मिळविले आहे. नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी सखोल अध्ययन त्यांनी केले. भविष्यात अधिक उंचीवर हे विद्यार्थी पोहचतील असा वि·ाास व्यक्त करुन शुभकामना दिल्यात. तर विभागप्रमुख डॉ. संदीप जोशी यांनी विद्याथ्र्यांनी विनम्रता आणि कृतज्ञभाव गुण अंगी जोपासून सकारात्मक दृष्टिनेे उत्तरोत्तर प्रगती साधावी आणि विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घालावी, असे आवाहन केले. याप्रसंगी सर्व यशस्वी विद्याथ्र्यांनीही विद्यापीठ तसेच विभागाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करीत आभार मानले. सूत्रसंचालन ऋषिकेश दौतपुरे, तर आभार प्रा. ज्योती पाटील यांनी मानले.