स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अंतर्गत अमरावती महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली

शासनाच्या निर्देशानुसार अमरावती महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण २०२५ ची सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगाने मा.आयुक्त सचिन कलंत्रे, मा.अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, मा.उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, मा. सहा.आयुक्त धनंजय शिंदे (झोन नं.४) व मा. वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव यांचे आदेशानुसार दिलेल्या आराखड्यानुसार आज दिनांक २९/०१/२०२५ रोजी मा.सहा.आयुक्त धनंजय शिंदे, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक शारदा गुल्हाने यांचे उपस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक २२ नवी वस्ती अंतर्गत येणाऱ्या शिवाजी नगर रोड ते रजा नगर या ठिकाणी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. सदर मोहीम मनपा स्थायी व कंत्राटी कामगारांचे सहभागाने घेण्यात आला. तसेच खुले प्लॉट, रोड साईड खुले मैदाने घाणीच्या ठिकाणी सर्व कागद, पन्नी, झाडे-झुडपे काढून व कचरा गोळा करुन संपूर्ण परिसरातील झाडू साफसफाई करण्यात आली व नागरिकांनी आपला घर परिसर स्वच्छ ठेवावे व कोणालाही घाण करु देऊ नये व करु नये या बाबत संदेश देऊन जनजागृती करण्यात आली.
सदर मोहीममध्ये सहा.आयुक्त धनंजय शिंदे, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक शारदा गुल्हाने, स्वास्थ निरीक्षक एम.ए. ढेंडवाल, आर. हडाले, बिटप्यून श्री बग्गन, श्री उसरे, कंत्राटदार यांचे प्रतिनिधी भुरू मार्वे, सुपरवाईजर व सर्व सफाई कामगार उपस्थित होते.