LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

पुण्यात जीबीएसचा पहिला बळी, सिंहगड परिसरातील 56 वर्षीय महिलेचा मृत्यू

पुणे : शहरात जीबीएसमुळे पहिला बळी गेला असून सिंहगड परिसरात राहणाऱ्या 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिला ही कॅन्सरग्रस्त होती.15 जानेवारी रोजी ससून रुग्णालयात त्या महिलेला दाखल करण्यात आले होते. आता तिचा मृत्यू झाला आहे. याआधी जीबीएस रुग्णामुळे सोलापूर येथील एकाचा मृत्यू झाला होता.

राज्यातील तसेच पुणे विभागातील जीबीएसमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. पुण्यात सध्या जीबीएसचे 127 रुग्ण आहेत. त्यांच्यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.

पुण्यात केंद्राच्या पथकाची पाहणी
गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा (GBS) पुण्यात उद्रेक झाल्याचं दिसून येत असून जिल्ह्यातील बाधित गावांत सध्या भीतीचे वातावरण आहे. पुण्यातील विविध भागात जीबीएसचे रुग्ण आढळले असून त्याची गंभीर दाखल आता केंद्राने घेतली आहे. केंद्राच्या सात सदस्यीय पथकानं 29 जानेवारी रोजी पुण्यातील नांदेड गावात भेट देत त्या ठिकाणच्या विहिरीतील पाण्याची पाहणी केली.

केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली), निम्हान्स (बंगळुरू), पुण्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्था (एनआयव्ही) या संस्थांमधील सात तज्ज्ञांचा समावेश होता.

दुसरीकडे संभाव्य परिस्थिती आटोक्यात राहावी यासाठी प्रशासनाकडूनही खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र GBS च्या रुग्णांवर मोफत उपचारांसाठी नेमलेल्या कमला नेहरू रुग्णालयात एकही न्यूरोलॉजिस्ट नसल्याचे पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) हा ऑटोइम्युन आजार असून तो प्रामुख्याने व्हायरल इन्फेक्शननंतर काही आठवड्यांत होतो. मात्र त्यावर उपचार उपलब्ध असल्याने लोकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

काय काळजी घ्यावी?

  • पाणी उकळून व गाळून प्यावे.
  • उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
  • अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
    कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?
  • दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
  • संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
  • काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
  • याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.
  • कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे
  • अतिसार
  • पोटदुखी
  • ताप
  • मळमळ किंवा उलट्या
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!