Crime NewsLatest News
२३ वर्षीय रशियन तरुणीसोबत भररस्त्यात भयंकर प्रकार, कोकणात खळबळ

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे याच जिल्ह्याला लागून असलेल्या गोवा राज्यात आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा वावर असतो आता गोव्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय पर्यटक येऊ लागले आहेत. याप्रमाणेच एक रशियन तरुणी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या मित्र-मैत्रिणींसह पर्यटनासाठी आली आहे. शिक्षण घेत असलेल्या या युवतीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यात एका रशियन युवतीचा विनयभंग करण्यात आला की मोठी धक्कादायक घटना घडली आहे. या सगळ्या घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत स्थानिक तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित युवकाविरोधात वेंगुर्ले पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या ४० वर्षीय युवकाने रेडी येथे एका पर्यटक रशियन युवतीचा विनयभंग केला. ही घटना मंगळवार, २८ जानेवारी रोजी दुपारी १२.४० वा.च्या सुमारास वेंगुर्ले तालुक्यातील रेडी-हुडा येथे घडली. 23 वर्षीय रशियन युवतीने ही तक्रार वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ती कॉलेज विद्यार्थिनी असून, मार्केटिंग आणि टुरिझम या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. सध्या ती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत भारतात पर्यटनासाठी आली आहे.
मंगळवारी ते सर्वजण गोवा येथून शिरोडा वेळागर किनाऱ्यावर आले होते. दुपारी ते पुन्हा गोवा येथे परतत होते. दरम्यान, रेडी- हुडा येथे एका मित्रांची गाडी स्लिप झाल्याने संबंधित रशियन युवती रस्त्यावर थांबली होती. त्यावेळी संशयित युवकाने तिच्या अंगाला स्पर्श करून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याबाबत तिने वेंगुर्ले पोलिसात तक्रार दाखल केली आहे. युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित युवकाविरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड तपास करत आहेत.
दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. अतिथी देवो भव: संस्कृती असणार भारतात असा प्रकार घडल्याने देशाचं नाव विदेशी पर्यटकांना भारत सुरक्षित वाटणार नाही. याकडे संबंधित व्यवस्थेने लक्ष द्यायला हवं.