LIVE STREAM

Crime NewsLatest NewsMaharashtra

“हनिट्रॅप मध्ये अडकवून सोनाराकडून १५ लाखांची खंडणी वसुल, तीन आरोपी ताब्यात”

छत्रपती संभाजीनगर : मी तुला मसाज शिकवितो? असा मॅसेज टाकणाऱ्या सोने चांदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला एका तरुणीसह दोन जणांनी हनिट्रॅपमध्ये अडकविले. सोनाराकडून गेल्या वर्षभरात १५ लाख रूपये वारंवार उकळण्यात आले. शेवटी वीस हजार रूपयांची खंडणी घेत असताना, तरूणीसह दोघांना सिटीचौक पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांची नावे मानसी जाधव, अर्जुन प्रकाश लोखंडे (वय ३७, रा. भीमनगर, भावसिंगपूरा), आदित्य ज्ञानेश्वर शिरे (वय २१, रा. भिमनगर, भावसिंगपूरा ) अशी आहे.

या तिघांच्या ताब्यातून एका पिस्टलसह तब्बल सात लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खंडणी प्रकरणात ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींना बुधवारी (२९ जानेवारी) रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. बेदरकर यांच्या कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने तिन्ही आरोपींना ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

 या प्रकरणात पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफा बाजारात सोने चांदी विक्री करणाऱ्या एका सोने चांदी विक्री करणारा व्यापारी सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांच्या कार्यालयात २८ जानेवारी रोजी आला. त्याने सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या दुकानात एक महिला आली. तिच्यासोबत २१ वर्षाची मुलगी होती. सदर महिलेने तिची मुलगी असल्याची ओळख करून देत, ती एअर होस्टेस असून स्पा (बॉडी मसाज) चेही काम करते. असे सांगितले. या ओळखीनंतर एके दिवशी सदर सोनाराच्या मोबाईलवर २१ वर्षाच्या तरूणीचा हिचा मॅसेज आला.या मॅसेजवरून व्यापारी आणि तरूणीमध्ये चॅटींग सुरू झाली.

मॅसेजचा गैरफायदा
चॅटींग करताना सदर व्यापाऱ्याने तरूणीला तुला मी मसाज शिकवितो. माझ्याकडे ये. असे मॅसेजवरून सांगितले. या मॅसेजचा गैरफायदा घेऊन, सदर तरूणीने व तिच्यासोबत अन्य काही जणांनी ब्लॅकमेल आणि पिस्टलचा धाक दाखवून संयुक्तपणे १५ लाख रूपयांची खंडणी वसुल केली. २८ जानेवारी रोजी पुन्हा तरूणीने व त्याच्या साथीदारांनी वीस हजार रूपयांची मागणी केली. अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

या माहितीवरून पोलिस आयुक्त प्रविण पवार, पोलिस उपायुक्त नितीन बगाटे आणि सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिटीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक निर्मला परदेशी, दुय्यम पोलिस निरिक्षक सचिन कुभांर,यांच्यासह मनिषा हिवराळे, अजित दगडखैर, अर्जुन कदम, सहायक फौजदार फुके, गायके, पोलिस हवालदार बोडखे, इरफान, पठाण, धवण, शाहेद, अतिक, जेठर, गायकवाड, फईम, हराळ, त्रिभुवन, कोळी, डंबाळे, सोनवणे यांनी सापळा रचुन २० हजार रूपयांची व्यापाऱ्याकडून खंडणी घेणाऱ्या मानसी जाधव सह अर्जुन प्रकाश लोखंडे आणि आदित्य ज्ञानेश्वर शिरे या तिघांना जोहरीवाडा जैन मंदिराजवळून ताब्यात घेण्यात आले आहे.
कल्याण घटनेप्रकरणी विशाल गवळीच्या फाशीसाठी प्रयत्न, एकनाथ शिंदेंनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट

या तिघांच्या ताब्यातून खंडणीची २० हजाराची रक्कम, एक डायरीचा छोटा कागद, दहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल, चाळीस हजाराची देशी बनावटीचे पिस्टल, मॅग्जीन, एक मोबाईल, एक स्कुटी आणि पाच लाखांची कार सह पन्नास हजार रूपयांचा आयफोन असा एकुण सात लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस असल्याची थाप
हनिट्रॅपमध्ये सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याला अडकविल्यानंतर, संबंधीत खंडणी घेणाऱ्यांनी व्यापाऱ्यावर दबाव आणण्यासाठी काही जणांना हे पोलिस असल्याचे सांगत, त्याच्याजवळ नेले होते. २१ वर्षीय तरूणी व त्याच्या सोबतच्या काही जणांनी व्यापाऱ्याकडून खंडणी वसुल केल्याचीही माहिती पोलिस उपायुक्त बगाटे यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!