Amaravti GraminLatest News
पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी मोझरीतील तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी दिली भेट

आज सकाळी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी भेट दिली. येथे त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि समाधीस्थळाचा विकास हा आपला कर्तव्य असल्याचे सांगितले. यावेळी आश्रमाच्या वतीने श्री. बावनकुळे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.”