LIVE STREAM

India NewsLatest News

१२.१२ आणि १२! सीतारामन यांची मोठी घोषणा; टायमिंग साधलं, गणित जुळवलं, अख्खं बजेट फिरलं

मुंबई :- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. प्रत्येक अर्थसंकल्पावेळी सगळ्यांचं लक्ष इन्कम टॅक्स स्लॅबवर लागलं होतं. अर्थसंकल्प सादर करायला घेतल्यानंतर जवळपास सव्वा तासानं निर्मला सीतारामन यांनी याबद्दलची मोठी घोषणा केली. १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. नव्या कर व्यवस्थेच्या अंतर्गत हा बदल करण्यात आलेला आहे. याआधी ही मर्यादा ७ लाख इतकी होती. ती आता थेट १२ लाखांवर नेण्यात आली आहे.

आता २४ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्यात येईल. तर ७५ हजार रुपयांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा मिळेल. अर्थमंत्री सीतारामन यांच्या मोठ्या घोषणेमुळे मध्यम वर्गाला सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांच्या आत असल्यास कोणताही कर द्यावा लागणार नाही. १२ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्यास १ रुपयादेखील कर द्यावा लागणार नाही. पण १२ लाखांपेक्षा १ रुपयादेखील जास्त असल्यास कर भरावा लागेल.

दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली. त्यामुळे मध्यम वर्गाला सगळ्यात मोठा दिलासा मिळाला. सकाळी ११ वाजता अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करायला घेतला. दुपारी १२ पर्यंत त्यांनी कोणतीही आकर्षक घोषणा केली नव्हती. पण दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी केलेल्या घोषणेनं मात्र सगळा नूर पालटला. नव्या कर रचनेनुसार १२ लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. पण जुन्या कर व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यानुसार पहिल्या ५ लाखांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. तर स्टँडर्ड डिडक्शन ५० हजार रुपये असेल.

जुना टॅक्स स्लॅब कसा?

० ते २.५ लाख- ०
२.५ ते ५- ५ लाख- ५%
५ ते १० लाख- २०%
१० लाखांहून जास्त- ३०%

नवा टॅक्स स्लॅब कसा?

० ते ४ लाख- शून्य कर
४ ते ८ लाख- ५%
८ ते १२ लाख- १०%
१२ ते १६ लाख- १५%
१६ ते २० लाख-२०%
२० ते २५ लाख- २५%
२५ लाखांपुढे- ३०%

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!