LIVE STREAM

Accident NewsAmravatiLatest News

अमरावती सरोज चौकातील वल्लभ भुवन हॉटेलला भीषण आग, लाखोंचा माल जळून खाक

अमरावती :- अमरावतीतील सरोज चौकात वल्लभ भुवन हॉटेलला गुरुवरच्या सायंकाळी लागलेली भीषण आग लवकरच नियंत्रणात आणली गेली. या आगीत मोठ्या प्रमाणावर मालमत्ता जळून खाक झाली, तर बाजूच्या संतान किड्स वेयर दुकानालाही या आगीचा फटका बसला आहे. या घटनेचा तपशील जाणून घेऊया.

अमरावतीच्या सरोज चौकात वल्लभ भुवन हॉटेलला ३० जानेवारी सायंकाळी भीषण आग लागली. तीन मजली इमारतीतील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीचे तुफान पसरत असताना, संतान किड्स वेयर दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेले फोम आणि कपडे देखील जळून खाक झाले.

वळ्लभ भुवन हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोन्ही कामगारांना पोलिसांनी वेळेत बाहेर काढून सुरक्षित केले. आगीची माहिती मिळताच, सरोज चौकपासून प्रभात चौक पर्यंत शेकडो नागरिकांचा जमाव जमला. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि सिटी कोतवाली पोलिसांनी तत्काळ स्थानिक पोलिसांसह गर्दी हटवून परिसर मोकळा केला.

आग लागल्यानंतर, सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. दुसऱ्या दिवशी शनिवारी, जळालेल्या साहित्याचे बाहेर काढण्यासाठी काम सुरू करण्यात आले.

सिटी न्यूजने संपूर्ण आगीच्या घटनेचे थेट प्रक्षेपण केले होते, त्यामुळे नागरिकांना या घटनेची योग्य माहिती मिळवता आली.
वल्लभ भुवन हॉटेलमधील नुकसान अंदाजे १४ लाख रुपयांच्या आसपास असून, हॉटेलमधील मशीन, फर्निचर आणि अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. तर बाजूच्या संतान किड्स वेयर दुकानातील फोम, कपडे आणि बेडशीट देखील जळून खाक झाले. याबद्दल संचालक प्रकाश टेकचंद पिंजानी यांनी नुकसान किती झाले याबद्दल काही सांगण्यास टाळले.

ही होती आजच्या बातम्या. या घटनेतील तपास सुरू असून, त्याबद्दल पुढील अपडेट्स लवकरच मिळतील.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!