तात्पुरत्या अपंग प्रमाणपत्रावर नोकरी मिळविल्याची धमकी देऊन खंडणी मागणारा आरोपी अटकेत

चांदुर रेल्वे :- चांदुर रेल्वे येथील एक लिपिक अपंग प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळविल्याच्या आरोपावरून खंडणीसाठी धमकावल्याची घटना समोर आली आहे. यासंबंधी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
चांदुर रेल्वे येथील फिर्यादी रणजीत वसंत तायडे, जे एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहेत, त्यांना २३ डिसेंबर २०२४ रोजी फोनवर एक कॉल आला. कॉल करणाऱ्याने आपले नाव राजीक शेख असून, त्यांना भेटायचं असल्याचं सांगितले. फिर्यादी तायडे यांनी या कॉलला प्रतिसाद देऊन, राजीक शेखला चपराशी पुरा सुंदरलाल चौकात भेटायला बोलावलं.
भेटी दरम्यान, राजीक शेखने फिर्यादीला धमकी देऊन सांगितलं की, “तुम्ही अपंग प्रमाणपत्रावर नोकरी मिळवली आहे, आणि ते तात्पुरते होते. जर तुम्हाला कम्प्लेंट करायची नसेल, तर तुम्हाला ३ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल.” राजीक शेखने फिर्यादीला दोन टप्प्यात ३ लाख रुपयांची मागणी केली. या धमकीनंतर राजीक शेख निघून गेला, आणि व्हाट्सअॅपवर तक्रारींचे मेसेज पाठवले.
फिर्यादीने या प्रकरणाची तक्रार गाडगे नगर पोलिसांकडे केली होती, परंतु हा प्रकरण फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने, ते प्रकरण फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले.३१ जानेवारी २०२५ रोजी फ्रेजरपुरा पोलिसांनी राजीक शेखवर कलम ३०८ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. ही होती आजच्या बातम्या. या प्रकरणाची पुढील तपास कार्यवाही सुरू असून, आरोपीला लवकरच अटक होईल अशी अपेक्षा आहे.