LIVE STREAM

Accident NewsLatest NewsMaharashtra

कुंभमेळ्यावरून परतताना भाविकांच्या वाहनाचा सापुतारा घाटात अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यु, 15 जण गंभीर जखमी

नाशिक :- नाशिक – सुरत महामार्गावर सापुताडा घाटात खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 15 जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. पहाटे साडेपाच वाजता अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

नाशिक – सुरत महामार्गावर सापुतारा घाटात खासगी लक्झरी बसला भीषण अपघात झाला आहे. खासगी बस 200 फूट दरीत कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात 7 जण जागीच ठार तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आज पहाटे 5:30 वआजेच्या दरम्यान अपघात झाला.

कुंभमेळ्यावरून परतताना भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला. भीषण अपघातात बसचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना अपघात झाला. अपघात झालेल्या बस मधील सर्व मयत आणि जखमी मध्य प्रदेशमधील असल्याची माहिती मिळत आहे.

महाकुंभमेळ्याला गेलेल्या रत्नागिरीतील तिघांचा अपघात :-

कोकणात रत्नागिरी येथून महाकुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. नाशिक जवळ सिन्नर येथे झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी येथील तिघांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात दुर्दैवीरित्या मृत्यू झालेल्यांमध्ये रत्नागिरी डीएड कॉलेजचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई यांचा समावेश आहे. याशिवाय चालक भगवान उर्फ बाबू झगडे व रत्नागिरी येथील हॉटेल व्यवसायिक अक्षय निकम यांचाही मृत्यू झालाय.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!