या वंदे भारत ट्रेनमध्ये फक्त आणि फक्त व्हेजच! नॉन व्हेज नेण्यासही बंदी; रेल्वेचा मोठा निर्णय

वंदे भारत ही देशातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. वंदे भारतने अनेकजण प्रवास करतात. वंदे भारतने प्रवास केल्यावर वेळेची बचत होते. अनेक ठिकाणी वंदे भारत ट्रेन धावते. त्यातील एक ठिकाण म्हणजे कत्रा. नवी दिल्ली ते कत्रा येथे ट्रेन जाते. याच ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नवी दिल्ली ते कत्रा वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फक्त शाकाहारी जेवण मिळणार आहे. नवी दिल्ली ते कत्रा येथे जाणाऱ्या ट्रेनमध्ये सर्वाधिक भाविक हे वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी जातात. वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी दिल्ली ते कत्रा येथे जाणाऱ्या ट्रेनमध्ये सर्वाधिक भाविक हे वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी जातात. वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
नॉन व्हेजला मनाई
जम्मू काश्मीरमधील कत्रा येथे वैष्णवदेवीचे मंदिर आहे. वैष्णवदेवीवर लाखो भाविकांची श्रद्धा आहे. हे लक्षात घेऊन रेल्वेने नवी दिल्ली ते कत्रा येथे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये १०० टक्के शाकाहारी अन्न देण्याचा निर्णय घेतला आहे. वैष्णवी देवीला दरवर्षी लाखो लोक जातात. वेगवेगळ्या राज्यातून लोक देवीच्या दर्शनासाठी येतात. वैष्णदेवीला जाण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे अनेकजण रेल्वेने जाण्याचा निर्णय घेतात.