LIVE STREAM

Latest NewsSports

आधी वाद, नंतर लाथ; ‘त्या’ निर्णयासाठी पंचांना थेट भिडणारा शिवराज राक्षे कोण ?

अहिल्यानगरमध्ये काल महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत पैलवान पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला. पण, या वर्षीच्या स्पर्धेत मोठा वाद निर्माण झाला होता. २०२५ या वर्षातील महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगरमध्ये काल पार पडल्या. या स्पर्धेत मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या स्पर्धेत मॅटवरील सेमीफायनल सामना हा पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पैलवान पृथ्वीराज मोहोळ असा झाला. या सामन्यात शेवटच्या काही वेळातच पृथ्वीराज मोहोळ याने डाव टाकत पै. शिवराज राक्षे याला पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पंचांनी राक्षे याला पराभूत घोषित केले.

पण, पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने पै. शिवराज राक्षे याला खाल पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवराज राक्ष याची पाठ टेकली नव्हती असा दावा राक्षे याने केला. यावेळी पंचांनी थोडा वेळ घेऊन निर्णय द्यायला हवा होता, असंही राक्षे म्हणाला. यावेळी पंच आणि शिवराज राक्षे यांच्यात वाद सुरू झाला. यावेळी पंचांची कॉलर पकडून राक्षे याने पंचांना लाथ मारली.

यामुळे आता कुस्ती संघटनेने पुढील तीन वर्षासाठी पैलवान शिवराज राक्षे याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यामुळे आता सर्व स्तरावरुन प्रतिक्रिया येत आहेत. पैलवान शिवराज राक्षे हा मोठा पैलवान आहे, गेली पंधरा वर्षे तो कुस्ती क्षेत्रात काम करत आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर त्याने सलग दोन वर्षे आपले नाव कोरले आहे. २०२३ आणि २०२४ या वर्षी त्यानी महाराष्ट्र केसरी स्पर्धो जिंकली आहे.

पैलवान शिवराज राक्षे हा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील रहिवासी आहे. शिवराज राक्षे याचे आजोबा पैलवान होते. राक्षे याचे वडीलही पैलवान होते. कुस्तीचा वारसा त्याला आपल्या घरातूनच मिळाला आहे. त्याने तो जपला आहे. पैलवान शिवराज राक्षे हा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील रहिवासी आहे. शिवराज राक्षे याचे आजोबा पैलवान होते. राक्षे याचे वडीलही पैलवान होते. कुस्तीचा वारसा त्याला आपल्या घरातूनच मिळाला आहे. त्याने तो जपला आहे.

शिवराज राक्षे याने लहान पणापासूनच कुस्तीचे धडे गिरवले आहेत. कुटुंबीयांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. यामुळे घरी दुधाचा व्यवसाय आहे. आपल्या घरात कुस्ती जपावी म्हणून वडीलांनी शिवराज याला पैलवान बनवले. काल झालेल्या सामन्यावेळी शिवराज राक्षे म्हणाला पंचांनी काल निर्णय घोषित केलेला तेव्हा मी आक्षेप नोंदवला होता. पण माझ्याकडे दुर्लक्ष केले. मल्लाचे दोन्ही खांदे जमिनीवर टेकलेले असेल तरच त्याला पराभूत घोषित केले जाते. माझे दोन्ही खांदे जमिनीवर टेकलेले नव्हते आणि जर खांदे जमिनीवर टेकल्याचे चित्रीकरणात दिसले तर मी हार मानायला तयार आहे, असंही राक्षे म्हणाला.

पैलवान शिवराज राक्षे याने याआधी दोन स्पर्धो जिंकल्या आहेत. २०२३ आणि २०२४ या वर्षाच्या त्याने स्पर्धा जिंकल्या, यानंतर राज्य सरकारने त्याला पुणे मनपामध्ये क्रिडा अधिकारीपदी नियुक्त केले. एबीपी माझा’ या वृत्तवाहिनेने पैलवान शिवराज राक्षे याच्या कुटुंबीयांची मुलाखत घेतली. यावेळी कुटुबीयांनी महाराष्ट्र केसरी २०२५ च्या स्पर्धा फिक्सिंग असल्याचा आरोप केला. यावेळी बोलताना शिवराज राक्षे यांच्या आई म्हणाल्या, पंचांनी असा निर्णय द्यायला नको होता. पंचांनी चूक मान्य केली नाही. त्यांनी त्यावेळी रिप्लाय दाखवायला हवा होता. ते दाखवले नाही. माझा मुलगा एवढ्या वर्षे कुस्ती खेळत आहे, असं काही करणार नाही आम्हाला माहित आहे. आतापर्यंत आम्ही पाहिले आहे, ते दरवेळी चुकीचा निर्णय देतात. शिवराजने आतापर्यंत कुस्तीत दहा कुस्त्या जिंकल्या आहेत. शेवटच्या कुस्तीत त्यांनी असा निर्णय घेतला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!