अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई नॅशनल युथ पार्लमेंट अवॉर्डने सन्मानित

अमरावती :- अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य डॉ. मनीष शंकरराव गवई यांना यावर्षीचा इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनायजेशन, इन्डियन पार्लमेंट फोरम ऑफ इंडिया आणि अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा युवक कल्याण क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठीचा नॅशनल युथ पार्लमेंट अवॉर्ड देऊन नुकतेच नवी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब येथील आयोजित समारंभात सन्मान करण्यात आला.
विशेष म्हणजे या समारंभात त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन देखील करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नोएडा फिल्म सिटी आणि मारवाह स्टुडिओचे संस्थापक संदीप मारवाह तर प्रमुख अतिथी म्हणून इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनायजेशनचे संस्थापक अविनाश साकुंडे,तिहाड जेलचे पोलीस अधीक्षक डी एस मौर्या,भारत सरकारच्या रेल्वे बोर्डचे सदस्य जोशुआ जेना,प्रेस क्लब ऑर्फ इंडियाचे कार्यालयीन सचिव जितेंद्र सिंह उपस्थित होते. युवकांना सशक्त करण्याच्या उद्देशाने दिल्या जाणारा नॅशनल युथ पार्लमेंट अवॉर्डसाठी यावर्षी अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांची एकमताने निवड करण्यात आली असून त्याना हा सन्मान नवी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब येथील आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूप सन्मानपत्र, स्मुर्तिचिन्ह,पदक, शाल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे या समारंभात त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन देखील करण्यात आले अमरावतीचे सुप