LIVE STREAM

Crime NewsNagpur

टी-शर्टचे ३०० रुपये मागितले असता मित्राने केली निर्दयी हत्या, नागपूरमधील शांतीनगर येथे धक्कादायक घटना !

नागपूर :- धक्कादायक! अवघ्या ३०० रुपयांच्या टी-शर्टवरून एका तरुणाचा जीव घेतला गेला आहे. नागपूरच्या शांतीनगर परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. मित्रानेच मित्राची हत्या केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ?

नागपूरच्या शांतीनगर भागातील कावरापेठ उड्डाणपुलावर रविवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली. शुभम हरणे या २१ वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्रांनी निर्दयीपणे हत्या केली. अक्षय या मित्राने काही दिवसांपूर्वी ऑनलाइन टी-शर्ट खरेदी केला होता, पण तो त्याला फिट न बसल्याने त्याने तो शुभमला दिला. मात्र, अक्षयने त्याबदल्यात ३०० रुपये मागितले. शुभमने पैसे देण्यास प्रथम नकार दिला आणि नंतर रागात पैसे फेकून दिले. यामुळे दोघांमध्ये वाद झाला.

या घटनेचे परिणाम रविवारी सकाळी दिसून आले. अक्षय आणि त्याचा भाऊ प्रयाग यांनी मिळून शुभमला कावरापेठ उड्डाणपुलावर नेले आणि तिथे प्रयागने चाकू काढून शुभमच्या गळ्यावर सपासप वार केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने शुभमने तिथेच जीव सोडला. आरोपी प्रयाग आणि अक्षय घटनास्थळावरून फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.

३०० रुपयांसाठी एका मित्राने मित्राचा बळी घेतल्याने नागपूर शहर हादरले आहे. ही घटना समाजातील नैतिकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करते. अशा घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी आणि युवकांमध्ये सहनशीलता वाढवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, यावर आता चर्चा होणे गरजेचे आहे. पुढील अपडेटसाठी पाहत राहा city news .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!