नवरा बायको दारू पिऊन तर्राट, चकना दिला नाही म्हणून पत्नीने रस्त्यावरच नवऱ्याला धोपटलं

अनेकदा दारू प्यायल्यानंतर माणूस भान हरपतो. आपण कुठे आणि काय बोलत आहोत, याची कल्पना नसते. अनेकदा दारू पिऊन लोक गोंधळ घालतात. पण कधी महिलेला भररस्त्यात गोंधळ घातलेलं आपण पाहिलंय का? राजस्थानमधून अशीच एक घटना समोर येत आहे. पती आणि पत्नी दोघांनी दारू पार्टी केली. नंतर दोघे पायी जात असताना रस्त्यावर बसले. पत्नीनं चकन्याची मागणी केली. पतीनं चकना आणला नाही. हाच राग मनात धरून पत्नीनं पतीला कानशिलात लगावली. हा सगळा तमाशा लोक पाहत होते.
नेमकं घडलं काय ?
सिरोहीमधील एक जोडपं दारूच्या नशेत काय करत होतं, हे त्यांना त्यांचं कळत नव्हतं. पती पत्नी आधी एकत्र दारू पार्टी करायला गेले. दोघांनीही मद्यपान केलं. दारू पिऊन पती पत्नी दोघेही पायी जात असताना रस्त्यावर बसले. बायकोनं नवऱ्याकडे चकन्याची मागणी केली. तेव्हा पतीनं चकना आणून देण्यास नकार दिला.
चकन्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर पत्नीनं पतीला भररस्त्यात मारहाण केली. नंतर रागाच्या भरात पत्नीनं पतीच्या कानशिलात लगावली. रस्त्यावरून जाणारे लोक हा सगळा तमाशा पाहत होते. परंतू नशेमध्ये असल्यामुळे दोघांना याचं भान नव्हतं.
दोघांनी मद्यपान केलं होतं, आपण रस्त्यावर काय करत आहोत, याची कल्पना त्या जोडप्याला नव्हती. दोघं शांत झाल्यानंतर रस्त्यावरून उठून आपल्या घरी गेले. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी जोडप्यांनी केलेल्या कृत्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.