LIVE STREAM

Accident NewsLatest NewsNagpur

नागपूर – भंडारा रोडवरील अपघात: साखरेच्या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग

नागपूर :- एक नजर नागपूरच्या बातम्यानवर, नागपूर – भंडारा रोडवर साखरेने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली. या आगीत ट्रकच्या ड्रायव्हरचे केबिन आणि इंजिन पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्री झाला. घटनास्थळी कळमना आणि लकडगंज अग्निशमन दल तातडीने पोहोचले, आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले.

“भंडारा रोडवरील आर्य मोटरसमोर साखरेने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली. आग लागल्यानंतर ट्रकच्या ड्रायव्हरचे केबिन आणि इंजिन पूर्णपणे जळून खाक झाले. घटना स्थळी कळमना आणि लकडगंज अग्निशमन दलाच्या तुकड्यांनी पोहोचून आग विझवण्याचे काम केले. या ट्रकमध्ये साखर होती, त्यामुळे आग लवकरच मोठ्या प्रमाणावर पसरली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे काही वेळात आग आटोक्यात आली. दरम्यान, ट्रक ड्रायव्हरला या अपघातात मोठ्या जखमा झाल्या असून त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होते, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

भंडारा रोडवरील साखरेने भरलेल्या ट्रकला लागलेल्या आगीत ट्रकचे ड्रायव्हरचे केबिन आणि इंजिन जळून खाक झाले, परंतु सुदैवाने मोठे जखम होण्याची बातमी नाही. पुढील घडामोडींसाठी बघत रहा सिटी न्यूज .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!