“सायकल चालवा, कॅन्सर पळवा!” – गीताई नर्सिंग होमतर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती रॅली

अमरावती :- आज आपण जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित “होप राईड” सायकल रॅली विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. “सायकल चालवा, कॅन्सर पळवा!” या प्रेरणादायी घोषणेने सायकलस्वारांनी अमरावती शहरात एक अतिशय महत्त्वपूर्ण संदेश दिला. ही रॅली गीताई नर्सिंग होमच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. चला, पाहूया यावर खास रिपोर्ट…
शहरातील अनेक नागरिक, डॉक्टर्स आणि सायकलस्वारांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला.हि रॅली गीताई नर्सिंग होम येथून निघून बस स्टँड, चपराशीपूरा चौक, वेलकम पॉइंट, पंचवटी चौक, गाडगे नगर चौक, शेगाव नाका, विलास नगर रस्ता, राजकमल चौक, राजापेठ, दस्तूर नगर चौक, जुना बियाणी चौक मार्गे प्रवास करत आयएमए कार्यालय येथे समाप्त झाली. या अनोख्या उपक्रमाद्वारे नागरिकांना कर्करोगाविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
“सायकल चालवा, कॅन्सर पळवा!” हा संदेश घेऊन ही सायकल रॅली यशस्वीपणे पार पडली. या उपक्रमाद्वारे नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीमुळे कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव करता येतो हा संदेश देण्यात आला.