“झोन क्र. १ मध्ये प्लास्टिक जप्ती व डस्टबिन मोहिम”
अमरावती :- मा.आयुक्त सचिन कलंत्रे, मा.अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव यांच्या निर्देशानुसार दि.०३/०२/२०२५ रोजी झोन क्र.१ अंतर्गत येणाऱ्या शेगाव नाका ते पंचवटी परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन बाबत मोहिम राबविण्यात आली व एकुण ३५ आस्थापनाधारक, किरकोळ विक्रेता यांचे आस्थापनाची तपासणी करण्यात आली असून तपासणी दरम्यान आस्थापनामध्ये कापडी अथवा कागदी बॅग किंवा ७५ मायक्रोनपेक्षा जास्त जाडीचे प्लॅस्टिक वापर करतांना आढळून आल्याने किरकोळ विक्रेत्यांकडुन प्लास्टिक जप्ती करण्यात आली तसेच २ आस्थापनामध्ये डस्टबिन बाबत आस्थापना प्रदिप ठाकरे यांना १०००/- रुपये, देवमाता रिफ्रेशमेंट यांना १०००- रुपये दंड व १ आस्थापनामध्ये प्लास्टिक पिशव्या आढळुन आल्याने आस्थापना रोशनी कँफे यांना ५०००/- रुपये दंड असे एकूण ७०००/-रूपये इतका दंड वसूल करण्यात आला व २ kg. प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. सदर मोहीममध्ये जेष्ठ स्वास्थ निरीक्षक राजु ढिक्याव, प्लॅस्टिक पथक प्रमुख नोडल अधिकारी व्हि.डि.जेधे, स्वास्थ निरीक्षक विनोद टांक, ए.एम सैय्यद, इमरान खान, मिथुन उसरे, प्रविण उसरे, श्री.सेनी उपस्थित होते.