अ. भा. आंतर विद्यापीठ वेट लिÏफ्टग (महिला) व बॉल बॅडमिंटन (महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठाचे संघ घोषित

अमरावती :- अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेट लिÏफ्टग (महिला) व बॉल बॅडमिंटन (महिला) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे संघ घोषित करण्यात आले आहे.
वेट लिÏफ्टग (महिला) संघ :-
सेंट्रल युनिव्र्हसिटी ऑफ हिमाचल प्रदेश, कंगराव्दारा डी.वाय.एस.एस.ओ. इंडोअर स्टेडियम, एच.पी.सी.ए. क्रिकेट स्टेडियम जवळ, धरमशाला येथे 14 ते 17 फेब्राुवारी, 2025 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेट लिÏफ्टग (महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला असून चमूचा प्रशिक्षण वर्ग सिताबाई कला व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे दि. 06 ते 10 फेब्राुवारी, 2025 दरम्यान होणार आहे. चमूमध्ये इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय, अमरावतीची कु. नेहा कलोसिया, श्री व्ही.आर. महाविद्यालय, सावनाची कु. साक्षी बुरकाळे, विज्ञान महाविद्यालय, मलकापूरची कु. अदिती तायडे व कला व विज्ञान महाविद्यालय, कु-हाची कु. विशाखा बोदडे यांचा समावेश आहे.
बॉल बॅडमिंटन (महिला) संघ
अलगप्पा युनिव्र्हसिटी, कराईकुडी येथे 29 मार्च ते 01 एप्रिल, 2025 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉल बॅडमिंटन (महिला) स्पर्धेकरीता संघ घोषित करण्यात आला असून चमूंचा प्रशिक्षण वर्ग डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावती येथे दि. 17 ते 26 मार्च दरम्यान होणार आहे. चमूंमध्ये छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगांव पूर्णाची कु. पूजा जामोदे व कु. सेजल वाटाणे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. राधिका दानखडे व कु. सायली मोहोड, प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, बडनेराची कु. श्रेया पुरी, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीची कु. रेवती इंगोले, प्रो. राम मेघे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेराची कु. चैताली बोबडे, एल.बी. अणे महिला महाविद्यालय यवतमाळची कु. साक्षी राऊत व कु. कीर्ती ताकतोडे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची कु. नंदिनी सावळे, पी.बी. कला महाविद्यालय दिग्रसची कु. साक्षी जाधव, एल.पी. पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, रिसोडची कु. गायत्री देशमुख, डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावतीची कु. छकुली ढेवळे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. निशा परमार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावतीची कु. पुनम पाठक यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.