“अंगणवाडी सेविकांचा महिला व बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर आक्रमक मोर्चा; सरकारविरोधात घोषणाबाजी”

अमरावती :- “अमरावती जिल्ह्यात आज हजारो अंगणवाडी सेविकांनी महिला व बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर आक्रमक मोर्चा काढला. या आंदोलनात सेविकांनी सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आणि लाडकी बहिण योजनेसाठी ५० रुपयांचा शुल्क मागणीच्या विरोधात आपला आक्रोश व्यक्त केला. मोर्चामुळे कार्यालयासमोरील मुख्य रस्ता काही काळ ठप्प झाला. सेविकांनी विविध मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत.
“मोर्चामध्ये सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. यासोबतच, त्यांची प्रमुख मागणी आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसारखा दर्जा, ग्रॅज्युएटी मिळावी, आणि महिन्याचे सर्व भत्ते वेळेत दिले जावेत. लाडकी बहिण योजनेतील कामाचा मोबदला देखील मिळावा अशी त्यांची मागणी आहे.”
आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांसारख्या सुविधा मिळाव्यात. ५० रुपये शुल्क घेणं अत्यंत अन्यायकारक आहे. आम्ही मागे हटणार नाही, जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करू.”मोर्चामुळे मुख्य रस्ता काही काळ ठप्प झाला, आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रशासनाने त्वरित ठोस निर्णय घेण्याचा इशारा सेविकांनी दिला आहे.”
“अंगणवाडी सेविकांनी आजच्या मोर्चाद्वारे आपला विरोध सरकारच्या धोरणांवर व्यक्त केला आणि विविध मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. प्रशासनाला त्वरित निर्णय घेण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. याबाबत अजून कोणते निर्णय घेतले जातात याकडे आता लक्ष लागून आहे. आगामी अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले राहा.”