Latest NewsMaharashtra PoliticsNanded
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी

नांदेड :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची शिवसेनेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आलीय. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला नांदेडकरांनी भरभरून आशीर्वाद दिलाय. त्यामुळे नांदेडकरांचे एकनाथ शिंदे हे आभार मानणार आहेत.नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानावर आभार सभा होणार आहे.या सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात आलाय.या आभार सभे साठी 25 हजार लाडक्या बहिणींना आमंत्रित करण्यात आले आहे.त्या सोबतच 25 हजार नागरिक असे एकूण 50 हजाराहुन अधिक नागरिक बसतील अशी आसन व्यवस्था तयार करण्यात आलीय. सकाळी 11 वाजता एजनाथ शिंदे हे नांदेड मध्ये येथील आणि 1 वाजता या सभेला संबोधित करतील. त्यामुळे एकनाथ शिंदे या सभेच्या माध्यमातून काय संवाद साधतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे.