नागपूर रेल्वे स्टेशनमध्ये महिला चोर गजाआड – चोरीचा मुद्देमाल ३६ तासांत हस्तगत

नागपूर :- नागपूर रेल्वे स्टेशनवर प्रवासाच्या गर्दीचा फायदा घेत महिलांची पर्स चोरणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी केवळ ३६ तासांत अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.घटना ३ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली, जेव्हा फिर्यादी वैजंती डहाळे नागपूर ते बैतूल प्रवासासाठी रेल्वे स्टेशनवर अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसमध्ये चढत असताना, चोरट्याने गर्दीचा फायदा घेत ४ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ३५०० रुपये रोख असलेली पर्स लंपास केली.
पोलिसांनी त्वरित तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे ६२ वर्षीय महिला आरोपीला पकडले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली व चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. ही उल्लेखनीय कारवाई डॉ. प्रियंका नारनवरे (पोलीस अधीक्षक, लोहमार्ग नागपूर) आणि त्यांच्या विशेष पथकाच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
नागपूर रेल्वे स्टेशनमध्ये महिला प्रवाशांची पर्स चोरणाऱ्या महिलेचा पर्दाफाश! तपास आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या ३६ तासांत आरोपी जेरबंद करण्यात आली आहे. संपूर्ण तपशील जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये.
नागपूर लोहमार्ग पोलिसांनी तातडीने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. रेल्वे प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी आता प्रवाशांमधून होत आहे