“मुख्यध्यापकाच्या अत्याचाराची पीडिता विद्यार्थिनी; आईने सरपंचाची मदत घेत शाळेत केली कारवाई”

जालना :- जालना जिल्ह्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा गुन्हा घडला. चौथीत शिकणाऱ्या दहा वर्षांच्या पीडित विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक प्रल्हाद किसन सोनूने याने जीवे मारण्याची धमकी देऊन तीन आणि चार फेब्रुवारी रोजी अत्याचार केले. हे पीडितेच्या आईच्या लक्षात येताच त्यांनी सरपंचांच्या कानावर ही बाब घातली. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सरपंच कल्याण देशमुख आणि गावकरी शाळेत गेले. मुख्याध्यापक सोनुने याला घडलेल्या घटनेचा जाब विचारला असता, त्याने सर्वांसमक्ष त्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची कबुली दिली. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी सोनुनेला चोप दिला.
संबंधित शाळेत दोन शिक्षक आहेत; मात्र दोघे कधीच एकत्रित उपस्थित नसतात. नेहा परडे या महिला शिक्षक आहेत. त्या अधूनमधून शाळेत येतात. सोनुने हा जालन्यातील चौधरीनगर भागात राहतो. तो २००९मध्ये निमखेडा तांडा जिल्हा परिषद शाळेत असताना अनेक अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्याला त्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. अनेक दिवस तो कोठडीत होता. त्यानंतर निलंबित झाला व परत नोकरीत रूजू झाला. मौजपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे अधिक तपास करीत आहेत.
दहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार
एका दहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून त्याचे फोटो आणि व्हिडिओ तयार करण्यात आले. हा प्रकार समोर आल्यानंतर मुलीच्या घरातल्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. ही घटना सातारा शहरातील एका उपनगरात घडली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीला घरात बोलावून त्याने अत्याचार केला; तसेच त्याचे फोटो व व्हिडिओ तयार करून ‘कोणाला सांगितलेस तर हे सर्वांना दाखवीन,’ अशी धमकी आरोपी पीडित मुलीला देत होता. त्यामुळे मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. हा प्रकार २६ ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या काळात घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक इंगळे या अधिक तपास करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापकाने चौथीतील मुलीला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन वर्गात तिचे दोन दिवस लैंगिक शोषण करून बलात्कार केला. हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यावर गावकऱ्यांनी या मुख्याध्यापकाला जोरदार चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.