AmravatiLatest News
“मनपा शाळा क्रमांक १७ मध्ये स्वच्छता आणि स्वच्छ भारत अभियानावर चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम”
मनपा शाळा क्रमांक १७ येथे वार्षिक स्नेहसंमेलन च्या अनुषंगाने सदर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता, स्वच्छ भारत अभियान या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच स्वच्छतेबाबत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण शालेय विद्यार्थ्यांद्वारे करण्यात आले. यावेळी झोन क्रमांक १ चे मा.सहायक आयुक्त नंदकिशोर तिखीले यांनी सर्वांना स्वच्छतेविषयी व प्लास्टिक बंदी विषयी वक्तव्य केले. यावेळी या ठिकाणी मुख्याध्यापिका कोडवते मॅडम, शाळा निरीक्षक वासनिक मॅडम, शहर समन्वयक श्वेता बोके, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक राजु डिक्याव, सर्व शिक्षकवृंद, स्वास्थ निरीक्षक ए.एम.सैय्यद, सचिन सैनी, बिटप्युन मयूर सारसर, संतोष काकडे, सफाई कामगार तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.