“मनपा शाळा क्रमांक १५ मध्ये स्वच्छता आणि स्वच्छ भारत अभियानावर चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम”
उत्तर झोन क्र.१ अंतर्गत मनपा शाळा क्रमांक १५ विलासनगर प्रभाग क्र.6 येथे वार्षिक स्नेहसंमेलन च्या अनुषंगाने सदर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता, स्वच्छ भारत अभियान या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच स्वच्छतेबाबत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण शालेय विद्यार्थ्यांद्वारे करण्यात आले. यावेळी झोन क्रमांक १ चे मा.सहायक आयुक्त नंदकिशोर तिखीले यांनी सर्वांना स्वच्छतेविषयी व प्लास्टिक बंदी विषयी वक्तव्य केले. यावेळी या ठिकाणी मुख्याध्यापिका मोरे मॅडम, शाळा निरीक्षक वासनिक मॅडम, देशमुख मॅडम, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक डिक्याव, सर्व शिक्षकवृंद, स्वास्थ निरीक्षक ए.एम. सैय्यद, सचिन सैनी, बिटप्यून मयूर सारसर, संतोष काकडे, सफाई कामगार तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रम मध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत बॅनर, होर्डिंग, पोस्टार्स व मार्गदर्शनद्वारे जनजागृती करण्यात आली.