थेट परकीय गुंतवणूक गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र अग्रेसर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळ, पुणे येथे लोट्टे इंडियाच्या हॅवमोर आईस्क्रीम उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, लोट्टे इंडियाचा हॅवमोर आईस्क्रीम प्रकल्प पुणे येथे झाल्यानंतर हॅवमोर आईस्क्रीमच्या उत्पादनात वाढ होईल व हे उत्पादन लाखो ग्राहकांपर्यंत पोहचेल. थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र जगात अग्रेसर असून महाराष्ट्र उद्योग विभाग यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. भारतातील ३५% थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे, या गुंतवणुकीमळे महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीचे केंद्र बनत आहे. दावोसमध्ये महाराष्ट्राने ₹१६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक खेचून आणली, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र शाश्वत औद्योगिक प्रगतीसाठी सज्ज आहे, लोट्टे इंडियासारखे उद्योग सर्वोत्तम दूत म्हणून काम करु शकतात असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, आमदार सुनील शेळके, लोट्टे इंडिया कंपनीचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते