हुडकेश्वर पोलिसांनी सोनसाखळी चोरी प्रकरणी आरोपीस अटक

नागपूर :- “नागपूरच्या हुडकेश्वर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत मोठ्या प्रमाणात चोरीस गेलेला ऐवज हस्तगत केला आहे. संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिस तपासात पुढील महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. पाहुयात ही संपूर्ण घटना.”
नागपूरच्या हुडकेश्वर भागात ३० जानेवारी रोजी एका घरात घरफोडी झाली होती. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नीने सकाळी ११.०५ वाजता घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. मात्र, दुपारी १.१५ वाजता परत आल्यावर त्यांना घरातील अलमारी उघडी दिसली. चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून तब्बल ३.४९ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
पोलिसांनी तपास सुरू केला असता, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे हिम्मतराव इंगोले या आरोपीचा शोध लागला. १ फेब्रुवारी रोजी हुडकेश्वर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी आरोपीकडून संपूर्ण चोरीस गेलेला ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली हिरो प्लेझर दुचाकी जप्त करण्यात आली.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, सहआयुक्त निसार तांबोळी, उपायुक्त रश्मिता राव आणि सहायक पोलीस आयुक्त विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
“हुडकेश्वर पोलिसांनी वेगवान तपास करून अवघ्या काही दिवसांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नागपूर शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अशाच आणखी ताज्या अपडेट्ससाठी जोडलेले राहा आमच्यासोबत!”